पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचा पुरंदर तालुक्यातील दिवे घाटानजीकच्या झेंडेवाडीतील “हॉटेल व्हिक्टोरिया इन” हॉटेलवरील जुगार अड्ड...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचा पुरंदर तालुक्यातील दिवे घाटानजीकच्या झेंडेवाडीतील “हॉटेल व्हिक्टोरिया इन” हॉटेलवरील जुगार अड्ड्यावर छापा; १८ जणांवर गुन्हा दाखल
सासवड : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने झेंडेवाडी येथील एका हॉटेलवर टाकलेल्या धाडीत सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १८ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण ३ लाख ६४ हजार ५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१/२०२६ अन्वये मुंबई जुगार कायदा कलम ४, ५ व १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुरंदर व हवेली तालुक्याला जोडणार्या दिवे घाटालगत पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी गावच्या हद्दीत पालखी विसाव्याशेजारी असलेल्या “हॉटेल व्हिक्टोरिया इन”च्या तिसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता तेथे तब्बल १८ जण पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत १ ) राहुल निळोबा फंड वय ४० रा. रांजणगाव ता.शिरूर जि.पुणे २ ) विवेक माणिकराव काळभोर वय ६४ रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे.३ ) दत्तात्रय राजाराम फडतरे वय ३६ रा. मु.पो.वरूड ता.खटाव जि.सातारा ४ ) रूपचंद तुकाराम साबळे वय ५२ रा. शिवधर सातारा ५ ) अहमद शब्बीर मोगल वय ४३ रा. लोणी स्टेषन कदमवाकवस्ती पठारेवस्ती लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे ६ ) जाॅन सबस्टिल नायर वय ५५ रा. दर्गावस्ती १७३ खडकी पुणे ३ , ७ ) अर्जुन पन्हालाल येरवाल वय २८ वर्षे रा. प्यासा हाॅटेलचे पाठीमागे लोणीकाळभोर पठारवस्ती ता.हवेली जि.पुणे ८ ) सुरेष भगवान घुले वय ५५ रा. मांजरी पोस्ट ऑफिस शेजारी ता.हवेली जि.पुणे ९ ) पुंडलीक गजानन काळभोर वय ४६ रा. बाजारमळा,लोणीकाळभोर १० ) मंगेष कृष्णकांत डोईजोड वय ५३ रा. ए १०३ डब्ल्यु सेक्टर मसुळकर काॅलनी पिंपरी अजमेरा काॅलनी महागनर पालीका मागे पुणे १८ ११ ) प्रज्वल संदिप अवगुडे वय २७ रा. अवताडेवाडी,हांडेवाडी ता.हवेली जि.पुणे १२ ) किरण रमेष बांदल वय ४६ रा. काळेपडळ हडपसर स.नं. ४९ नेहरूपार्क १३ ) शिवकुमार विष्वनाथ मथपरी वय ५२ रा. वारजे,गणेषपुरी सोसायटी स.नं. ४५ घर नं. २४०३ वारजे पुणे ५८ १४ ) अमित शंकर घुले वय ४० वर्षे रा. मांजरी बुद्रुक चिलाही रोड ता.हवेली जि.पुणे १५ ) अमित पांडुरंग राऊत वय ३९ रा. शास्त्रीनगर कोथरूड स.नं. ८२ /२२ गाढवे काॅलनी 16) राकेष बबन मोहिते य ३५ रा. सनसवाडी बजरंगवाडी ता शिरूर जि.पुणे हे पैसे लावुन जुगार खेळताना मिळुन आले तसेच बबन जगन्नाथ मानकर वय ४४ रा. लासुर्णे ता.इंदापुर जि.पुणे हा जुगाराचा अडडा चालवित असताना मिळुन आला.तसेच विजय बाबुराव कोल्हापूरे वय ६६ रा. कोल्हापुरे बिल्डींग लक्ष्मी बिल्डींग १५ नंबर हडपसर पुणे याने त्यांना जुगार खेळण्यासाठी त्याच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली तसेच पार्टनरशिप मध्ये सदरचा धंदा चालविला त्यामुळे त्यावरील अ.क्र.१ ते १६ तसेच बबन जगन्नाथ मानकर वय ४४ रा.लासुर्णे ता.इंदापुर जि.पुणे व विजय बाबुराव कोल्हापूरे वय ६६ रा. कोल्हापुरे बिल्डींग लक्ष्मी बिल्डींग १५ नंबर हडपसर पुणे यांचे सर्वांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 4, 5, 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य व अन्य मुद्देमाल असा एकूण ३ लाख ६४ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.विशेष म्हणजे, ही धाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पुणे ग्रामीण यांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे .पुढील तपास सासवड पोलिस करीत आहेत .

COMMENTS