पुरंदर तालुक्यातील रस्त्याच्या कडेची धोकादायक झाडे ठरतायेत यमदूत, सार्वजनिक बांधकाम विभागा व वन विभागाला जाग कधी येणार? सरसकट रस्त्याच्या...
पुरंदर तालुक्यातील रस्त्याच्या कडेची धोकादायक झाडे ठरतायेत यमदूत, सार्वजनिक बांधकाम विभागा व वन विभागाला जाग कधी येणार?
सरसकट रस्त्याच्या कडेची झाडे तोडली जाऊ नयेत तर जी झाडे वाळलेली,वठलेली आहेत धोकादायक आहेत तीच तोडावीत आणि त्या झाडांच्या जागी नवी देशी झाडे लावावीत
पुरंदर तालुक्यातील रस्त्याच्या कडेची झाडे ही यमदूत ठरत आहेत या वाळलेल्या,वठलेल्या धोकादायक झाडांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच दोनच दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड नजीकच्या पिंपळे गावाच्या हद्दीत वडाचे झाड अंगावर पडल्याने तीन निष्पाप जिवांचा बळी गेला यामध्ये लग्नाला अवघे 4 महीने झालेले दांपत्य आणि एक अवघ्या सात वर्षांची छोटी मुलगी या अपघातात दगावली या दुर्दैवी घटनेनंतर या वठलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील इतर छोटे रस्ते यांच्या कडेला असणारी वठलेल्या,जीर्ण,वाळलेल्या अवस्थेतील अनेक झाडे धोकादायक स्थीतत आहेत किंवा या झाडांच्या फांद्या या रस्त्यावरती आलेल्या आहेत काही झाडे तर रस्त्याच्या अगदी लगत असल्याने या झाडांच्या फांद्या कधीही रस्त्यावरून येणार्या जाणार्या वाहनांवर पडू शकतात याकडे संबंधित विभागाचे मात्र अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही झाडे जर तोडली तर वन विभाग कारवाई करतो या भीतीने शेतकरी देखील या ठिकाणी या झाडांना हात लावायची हिम्मत करीत नाही तसेच ही झाडे रस्त्याच्या कडेला असल्याने ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतात त्यामुळे एकीकडे वन विभाग दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दुहेरी कात्रीत सापडलेले शेतकरी या झाडाला हात लावत नाही त्यातच काही शेतकरी देखील झाडाची सावली शेताच्या पिकावर ती पडते व यामुळे वसवा पडून शेतातील पिकांचे नुकसान होते किंवा शेतातील पिकाची वाढ खुंटते या कारणास्तव रात्रीच्या वेळी या झाडांच्या बुंध्या मध्ये रॉकेल, गंधक, किंवा डिझेल ओतून आग लावून देतात व तीन ते चार दिवसानंतर हे झाड आपोआप वठते आणि असे ही वाळलेली झाड हे कधीही पडू शकतात
पिंपळे येथे घडलेल्या दुर्घटनेतील झाडाचा बुंधा देखिल जळालेला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होतं हे झाड कधीही पडू शकणार होतं आणि त्याला निमित्त फक्त त्या दिवशीचा अवकाळी पावसाचा आणि वार्याचा झालं आणि या दुर्दैवी घटनेमध्ये तीन निष्पाप जिवांचा बळी गेला मात्र संबंधित विभागाने वेळेवर या रस्त्याच्या कडेच्या झाडांची तपासणी केली व या झाडांची तपासणी केल्यानंतर ते झाड वेळेत काढून टाकले असते तर ते पडले नसते आणि निष्पाप जीव वाचले असते .
अशा पद्धतीची घटना दोनच महिन्यापूर्वी चांबळी येथे देखील घडले होती सुदैवाने या अपघातात किरकोळ जखमी होऊन हे कुटुंब देखील थोडक्यात बचावले होतं मात्र तरीदेखील पडलेले झाड अवाढव्य होत आणि ते झाड चारचाकी वरती पडलं होतं या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचा मात्र चक्काचूर झाला होता अशाच पद्धतीची ही झाडे पावसाळ्यात येणारा सोसाट्याचा वारा आणि जोराचा पाऊस यामुळे पडतात तेव्हा पावसाळ्यापूर्वीच रस्त्याच्या कडेच्या झाडांचे ऑडिट आणि तपासणी होणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्यामार्फत या धोकादायक झाडांची तपासणी केली जावी यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी यासोबतच पोलीस पाटील यांची देखील मदत घेतली गेल्यास व स्थानिक नागरिकांच्या देखील रोजच्या येण्याजाण्याचा रस्ता असल्याने त्यांना ही माहिती असते ती कोणते झाड धोकादायक आहे कोणते झाड वाळलेले आहे किंवा वठलेल आहे किंवा कोणत्या झाडाच्या फांद्या धोकादायक आहे आणि त्या कधीही पडू शकतात नागरिकांकडून येणाऱ्या सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी देखील गांभीर्याने घेऊन त्यांची दखल घेणे गरजेचे आहे.
एकंदरीत पुरंदर तालुक्यातील ही धोकादायक झाडेही यमदूत बनत चालली आहे आणि संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. आता कालच्या झालेल्या दुर्घटनेमुळे पुरंदर तालुक्यातील रस्त्याच्या कडेच्या झाडांचा तपासणी व ऑडिट केले जावे व धोकादायक झाडे शोधून ही झाडे काढवीत व त्यांच्या जागी दुसरी झाडे लावली जावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वनविभागाने गस्त घालून या झाडांचे बुंधे पेटवून त्यादेणर्या महाभागांचा शोध घेऊन त्यांच्यावरती सक्त कारवाई करणे हे देखील आता काळाची गरज बनल आहे. कारण आता पावसाळा जवळ येतो आहे आणि अवकाळी पावसाचा देखील हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे . पुढील चार ते पाच दिवस देखील अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने व वन विभागाने तात्काळ पुरंदर तालुक्यातील अशा धोकादायक झाडांची तपासणी करून ही झाडे काढावीत आणि धोकादायक फांद्या तोडाव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हे सर्व होत असताना संबंधित विभागांना व अधिकाऱ्यांना जाग येईल का?


COMMENTS